मास्तर कृष्णरावांच्या सांगीतिक कारकिर्दीस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आणि मास्तरांच्या वन्दे मातरम् कार्याच्या गौरवार्थ सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे दिनांक २७ जुलै १९४१ रोजी म्युझिक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. त्यावेळी या म्युझिक कॉन्फरन्समध्ये मास्तर कृष्णराव यांचे गाणे झाले त्यास वरील फोटोतील सर्व उपस्थित मान्यवर आणि इतर रसिकांसमोर त्यांनी ''सदा चिरंजीव हो'' ही सोहोनी-भटियार या जोड रागातील स्वरचित चीज गायली आणि शेवटी स्वकृत चालीतील संपूर्ण ''वंदे मातरम्'' हे मातृभूमीचे वंदनीय गीत गायले.
गाण्यानंतर सरोजिनी देवी नायडू यांनी भाषणाची सुरुवात 'वंदे मातरम् वाले मास्टर कृष्णराव' अशी करून 'गायकांचा नेता' असे संबोधत त्यांचा सत्कार व गौरव केला.
फोटोमध्ये डावीकडून -
विलायत हुसेन खान (आग्रेवाले), मास्टर कृष्णराव, सरोजिनीदेवी नायडू, उस्ताद अल्लादिया खांसाहेब (जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक), सरदार आबासाहेब मुजूमदार, वीर नरिमन आणि इतर.