'स्वरयात्री २०२२' ही मास्टर कृष्णरावांचा (उर्फ मास्तर) जीवनपट आणि सांगीतिक कार्यकर्तृत्व विशद करणारी दिनदर्शिका आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन पं. वसंतराव गाडगीळ यांचे शुभ हस्ते २५ डिसेंबर २०२१ रोजी मास्तरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाची नांदी ह्या कार्यक्रमात पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे झाले.