संगीत कारकीर्द - सुगम संगीत

संगीत शास्त्रकार डॉ.अशोक दामोदर रानडे यांनी अभ्यासाअंती मास्तरांना 'मराठी सुगम संगीताचे प्रवर्तक' म्हटले आहे. मास्तरांनी दिलेले प्रभात फिल्म कंपनीच्या 'गोपालकृष्ण' सारख्या चित्रपटातील संगीत अवघड आणि बोजड नाही. ते संगीत म्हणजे मराठी सुगम संगीताची पायाभरणी आहे असे डॉ. रानडे यांनी मास्तरांच्या संगीताविषयी एका लेखामध्ये विचार मांडले आहेत.

मास्तरांच्या चाली या सुगम आणि सहज असून बहुसंख्य संगीत रचना कमीत कमी स्वरांमध्ये केलेल्या दिसून येतात. त्या रचनांमध्ये गुंतागुंतीच्या अवघड सांगीतिक करामती न करता सहजभावाला महत्त्व दिलेले दिसून येते.

संवाद व संपर्क

अनुसरण करा