फोटो गॅलरी

Back to View Album

समारंभ

Click on the image to enlarge

बालगंधर्व रंगमंदिराच्या उदघाटनाचे वेळी नांदी गात असताना मध्यभागी मास्तर कृष्णराव

संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार व रत्न सदस्यत्व प्रदान सोहळ्यात मास्तर कृष्णरावांच्या निवासस्थानी मास्तरांचा सत्कार करताना पु.ल.देशपांडे आणि मास्तरांच्या शेजारी ज्योत्स्नाबाई भोळे व पं. भीमसेन जोशी

दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे हस्ते पद्मभूषण पुरस्कार स्वीकारताना मास्टर कृष्णराव.

पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिराची कोनशीला मास्तर कृष्णराव यांच्या शुभहस्ते बसवली गेली. त्यावेळी पूजन करतेवेळी मा. कृष्णराव

१९५३ साली भारत सरकारने कलावंतांचे सांस्कृतिक पथक चीन येथे पाठवले होते. त्या पथकाचे नेतृत्व मास्टर कृष्णराव (मध्यभागी बसलेले) यांनी केले. या कलावंतांनी तेथे सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचा आरंभ मास्टर कृष्णरावांच्या समवेत त्यांच्याच चालीतील संपूर्ण वंदे मातरम् गाऊन व्हायचा.

१२ फेब्रुवारी १९३८ रोजी पुण्यात पूना म्यूझिक सर्कलतर्फे सरदार पुरंदरे यांच्या वाड्यात उस्ताद अल्लादियाखांसाहेबांचं गायन झालं. त्याचवेळी त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला. या निमित्तानं त्यांचा मुक्काम मास्टर कृष्णरावांच्या घरी होता. त्यावेळी काढलेला हा फोटो एप्रिल १९३८च्या चित्रमयजगतात छापून आला. मागे उभे (डावीकडे) श्री. मल्लिकार्जुन मन्सूर आणि शेजारी पखवाजवादक श्री. शंकरभय्या घोरपडकर. पुढे बसलेले (डावीकडून) मास्टर कृष्णराव व त्यांचा पुत्र राजा फुलंब्रीकर, उस्ताद अल्लादियाखांसाहेब, सरदार आबासाहेब मुजुमदार, श्री. भालचंद्र खांडेकर आणि श्री. पु. र. कोकिळ

संवाद व संपर्क

अनुसरण करा