गाण्यात रंगलेले मा. कृष्णराव - (डावीकडून) वसंतराव देसाई, वसंतराव आचरेकर (तबल्यावर), मागे अण्णा जोशी (दुसरे तबलजी), मा. कृष्णराव , प्रभाकर जोग (व्हायोलिनवर) आणि सुधीर फडके उर्फ बाबूजी (संवादिनीवर)
मैफलीत प्रसन्न मुद्रेने गायन सादर करण्यासाठी जात असताना मास्तर कृष्णराव (छायाचित्रकार : कै. माधव कृष्णराव तथा राजाभाऊ फ़ुलंब्रीकर)
गुरुवर्य पं.भास्करबुवा बखले आणि त्यांचे पुत्रवत पट्टशिष्य मास्टर कृष्णराव. दोन वेगळे फोटो एकत्र जोडलेले जरी असले तरी एकाच वेळी काढलेले आहेत. १९१५ साली बुवांना काश्मीरला गायन सादर करायला आमंत्रित केले होते त्यावेळी त्यांनी मास्तरांना तंबोऱ्यावर साथीला बरोबर नेले होते.
कराची येथे सेठ लखमीचंद इसरदास नारंग उर्फ लालाजी यांच्या निवासस्थानी झालेल्या घरगुती मैफलीत गायन सादर करताना मास्टर कृष्णराव