वंदे मातरम् सामूहिकरित्या म्हणायला कठीण आहे त्यामुळे ते राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात अडचण येत होती म्हणून मास्तर कृष्णरावांनी मिश्र झिंझोटी रागात सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना सामूहिकरित्या म्हणता येईल अशी सोपी चाल वंदे मातरम् गीतास लावली.
हे गीत जरी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही तरी ते भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (national song) म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यास राष्ट्रगीता इतकाच समान बहुमान देण्यात आला. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात मास्तरांनी चाल देऊन गायलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड भारतात विशेषतः महाराष्ट्रात सभासमारंभात, शाळा, महाविद्यालये अशा ठिकठिकाणी वाजवली जायची.
'अमर हैं हिंदोस्तान', ' होशियार रहना' , 'सबको अपनाही धर्म प्यारा' इत्यादी देशभक्तीपर गीतेही मास्तरांनी रचली व त्यांना चाली दिल्या. या गीतांचे 'राष्ट्र संगीत' नावाचे स्वरावलीसहित मास्तरांनी एक पुस्तक प्रकाशित केले होते. 'वंदे मातरम्' या क्रांतीगीताबरोबर वर नमूद केलेल्या पुस्तकातील गीतेदेखील मास्तरांनी अनेक राष्ट्रपुरुषांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या प्रसंगी म्हटल्याचाही उल्लेख जुन्या वृत्तपत्रातील कात्रणात सापडतो.
अमर हैं हिंदुस्तान हमारा ( सन १९४५ संगीतकार : मास्टर कृष्णराव)
होशियार रहना ( सन १९४५ संगीतकार : मास्टर कृष्णराव)